सावंतवाडी : राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ सावंतवाडी आयोजित शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अटल प्रतिष्ठान संचलित विद्याभारती कोकण प्रांत संलग्न स्व.वसंत शिशुवाटिका विद्याधर भागवत शिशुवाटिका या छोट्या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते राजा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बाल विद्यार्थ्यांनी राजा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये विविध कार्यक्रमाचे उत्साहात सादरीकरण केले.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष बंड्या तोरस्कर, विजय पवार, सचिव दीपक सावंत, महादेव राऊळ, मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, सुरेश भोगटे, अटल प्रतिष्ठानचे डॉ.कार्लेकर, रामाने टीचर, दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, दिपाली भालेकर, धनश्री देऊस्कर, सुधीर पराडकर, संजय साळगावकर, राजेंद्र सांगेलकर, तुकाराम कासार, पल्लवी कासार, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव उपस्थित होते.





