निगुडे रस्त्याची दुरुस्ती कि थुकपट्टी..?

161

भगवान शेलटे | सावंतवाडी : तालुक्यातील निगुडे गावात रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. मात्र, हे काम सुरु असताना कामाच्या दर्जाबाबत अनेकांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रस्त्याच्या साईड पट्टीचं, रुंदीकरणाच काम सुरु असताना वर वर खडी आणि रेती टाकली जात आहे. अशा प्रकारच काम जास्त दिवस टिकणार नसल्याच बोलल जात.

याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन काम करून घ्याव अशी मागणीही ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी करण्यात आलेला निगुडे रस्ता हा सुस्थितीत होता. मात्र, ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे या रस्त्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे इथं दर्जाहीन काम झाल्यास पुन्हा रस्त्याची परिस्थिती जैसे थे होऊ शकते.