स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने साजरा होणार ‘ शिवजयंती महोत्सव २०२३’

134

कुडाळ : स्वराज्य मित्र मंडळ माठेवाडा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मोठ्या प्रमाणात “शिवजयंती महोत्सव २०२३” जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी सकाळी दहा वाजता शिवजन्म सोहळा साजरा होणार आहे तर सकाळी 11 वाजता पोवाडे नृत्य आणि वक्तृत्व स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी चार वाजता विविध स्पर्धा महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे सायंकाळी सहा तीस वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात येणार आहे तर सायंकाळी 7:30 वाजता वारसा शिवरायांचा मराठी संस्कृतीचा ओंकार कला मंच सावंतवाडी यांच्यावतीने बहारदार कार्यक्रम करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन स्वराज्य मित्र मंडळ माठेवाडा कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे