जि.प शाळा आसोली नं. १ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात | उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त प्रफुल्ल ठोकरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

154

सावंतवाडी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक श्री देव नारायण विद्यामंदिर आसोली नं. 1 शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार संघटना सिंधुदुर्ग यांच्यावतीने आसोली शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल ठोकरे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली तळमळता बघून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तसेच यावेळी हितेश सुरेश कांबळी याला आदर्श विद्यार्थी तर इंदु वसंत गावडे हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे सिंधुदुर्ग अध्यक्ष सन्माननीय संतोष तळवणेकर यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व राष्ट्रीय छावा संघटना यांच्याकडून सन्मानपत्र देण्यात आले.

सदर कार्यक्रमास संतोष तळवणेकर सर, कल्याण कदम सर, पारधी सर, आसोली ग्रामपंचायत सरपंच बाळा जाधव, आसोली विकास मंडळ मुंबई अध्यक्ष अशोक धुरी, विजय धुरी, सुरेश धुरी, प्रकाश परब कार्यक्रमाचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश पोळजी हे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते रुपेश पाटील हे होते.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र याचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रितेश किनळेकर, सुरेश कांबळी, सुजाता देसाई, शाळा स्थापन समिती उपाध्यक्षा सुचिता गावडे, माता पालक संघ संपदा नाईक मॅडम, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष विनोद गावडे, राघोबा राउळ आणि सर्व पालकवर्ग तसेच शाळेतील सहकारी शिक्षक संदीप सावंत, अमोल आग्रे, ईश्वर थडके, सुकांती नाईक, प्रसाद गावडे या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर थडके यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल ठोकरे यांनी केले.