उदयनराजे भोसले यांची कल्पना | राजे प्रतिष्ठान, कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्यामार्फत घराघरांमध्ये महाराजांची मूर्ती प्रदान

114

सावंतवाडी : राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे संपादक अध्यक्ष श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले यांच्या कल्पनेतून प्रत्येक घराघरांमध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. राजे प्रतिष्ठान कामगार सेना, कामगार सेना सिंधुदुर्ग यांच्यामार्फत प्रत्येकाच्या घराघरांमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देण्यात आली.

यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष तळवणेकर, उपाध्यक्ष संदीप नाईक, सचिव ज्ञानेश्वर पारधी, सदस्य सचिन गावडे, राष्ट्रीय छावा संघटना, प्रवक्त शिवा गावडे, खजिनदार मंगेश माणगावकर, प्रतिष्ठान माडखोल अध्यक्ष संदीप चादेलकर, सल्लागार श्याम सावंत यावेळी उपस्थित होते.