शिवजयंती महोत्सव २०२३…!

कुडाळ : मराठा समाजाकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मोठ्या प्रमाणात शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
मालवण किल्यावरून शिवज्योत घेऊन मावळे सकाळी 10,30 वाजता संत राऊळ महाराज कॉलेजकडे येतील व रॅलीने जिजामाता चौक येते आगमन होईल व शिव जन्म सोहळा साजरा होईल.

येथे महाराजांचा जन्म उत्सव पाळणा म्हणून केला जाईल. या सोहळ्याला मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित असेल व त्या नंतर राजमाता जिजाऊला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज नगरमध्ये महाराजांना पुष्पहार व शिवज्योत तेथे ठेवली जाईल.

सायंकाळी ठीक 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होईल. त्यामध्ये शिवचरित्र आधारीत डान्स, सत्कार, व नाटिका सादर होणार आहे. तरी या उत्सवाला सर्वांनी उपस्थित राहावे असे मराठा समाजाकडून सांगण्यात आले.