वैभववाडी महोत्सवचा शोभायात्रेने शुभारंभ | रोटरी क्लबकडून महोत्सवाचे आयोजन

वैभववाडी : रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने आयोजित वैभववाडी महोत्सवाला शोभायात्रेने दिमाखात सुरुवात झाली आहे. महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी तहसीलदार प्रसन्नजित चव्हाण, नगराध्यक्षा नेहा माईणकर व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. महोत्सवात आयोजित रस्सीखेच स्पर्धेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रस्सीखेच स्पर्धेसाठी गावागावातील संघ दाखल झाले होते. या महोत्सवात खाद्य महोत्सवाचे ही आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचा लाभ तालुक्यातील विद्यार्थ्याना महिलांना व खेळाडुंना होणार आहे. तसेच वैभववाडी तालुक्याच्या सांस्कृतीक परंपरेत मोलाची भर पडणार आहे. या महोत्सवात वैशिष्ट पुर्ण अशी रस्सीखेच स्पर्धा आहे. खाद्यामहोत्सव या महोत्सवाच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना त्यांचे खाद्य पदार्थ व साहित्य विक्री करण्यासाठी खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या खाद्य महोत्सवात २४ स्टाॅल असून कोकणातील विविध खाद्य पदार्थ खव्वय्यांना खाण्यासाठी मिळणार आहेत. व कोकणी पदार्थ साहित्य खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

रस्सीखेच स्पर्धेतील विजेत्यास ४ फुटी ढाल व रोख ३००० रु. पारितोषिक, उपविजेत्यास ३ फुटी ढाल व रोख २००० रु. पारितोषिक व तृतीय विजेत्यास २ फुटी ढाल व रोख १००० रु. पारितोषिक देण्यात येणार आहे. सौंदर्य स्पर्धा- ही स्पर्धा  मुलींसाठी, वैभव कन्या महिलांसाठी, वैभवलक्ष्मी  तरुणांसाठी, वैभवरत्न व उभयतांसाठी, वैभववाडी आयडाॅल अशा चार विभागात होणार असून स्पर्धा दोन फेऱ्या मध्ये होणार आहे.

शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळात रस्सीखेच स्पर्धा, संध्याकाळी ७ ते ९ सौंदर्य स्पर्धा, अंतिम फेरी, रात्रौ ९ ते ९:३० सामाजिक शैक्षणिक क्षैत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार व विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ रात्रौ ९:३० ते ११ जिल्हायातील कलाकारांचा सांस्कृतीक महोत्सव.

या महोत्सवासाठी विशेंष अतिथी म्हणून आमदार नितेशजी राणे,  रोटरी डिस्ट्रिक गव्हर्णर रो. बबन देशपांडे, वैभववाडी नगरध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, २०२३ -२४ चे रोटरी डिस्ट्रिक गव्हर्णर रो.नासीरभाई, डिस्ट्रिक्ट हेड रो.प्रणय तेली, असिस्टंट गव्हर्णर रो. दिपक बेलवलकर शुक्रवारी उपस्थित राहणार आहेत. वैभववाडी महोत्सवाचा तालुक्यातील व जिल्हयातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे प्रेसीडेंट रो. संतोष श्रीधर टक्के, सेक्रेटरी  रो.संजय शिवाजी रावराणे व टेझरर रो. प्रशांत धनाजी गुळेकर यांनी केले आहे.