देवगड (प्रतिनिधी)
श्री खवळे महागणपतीच्या त्रिशताब्दी रौप्यमहोत्सवी आयोजित राज्यस्तरीय भजन स्पर्धेत श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ वैभववाडी प्रथम देवगड-तारामुंबरी येथील भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या श्री खवळे महागणपतीच्या त्रिशताब्दी रौप्यमहोत्सवी (३२५) वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत श्री दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ- वैभववाडी (बुवा विकास नर) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या भजन मंडळाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते रोख बक्षीस, आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध स्पर्धांचाही निकाल घोषित करून विजेत्यांना पालकमंत्री राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
बक्षीस वितरणप्रसंगी माजी आमदार अँड अजित गोगटे, खवळे महागणपती ट्रस्ट व उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे, समितीचे सचिव अक्षय खवळे, भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, तालुका सरचिटणीस योगेश चांदोस्कर, नगरसेवक संतोष तारी, रोहन खेडेकर, भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, नरेश डामरी, वैभव करंगुटकर, खवळे महागणपती ट्रस्ट उत्सव समितीचे अण्णा खवळे, प्रसिद्धीप्रमुख विकट खवळे, दिनेश खवळे, सचिन खवळे, राजू खवळे, चिन्मय खवळे, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, ज्ञानेश्वर खवळे आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय भजन स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्री सिद्धीविनायक भजन मंडळ- जानवली (बुवा दुर्गेश मिठबावकर) यांनी, तृतीय क्रमांक श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, शिरसे- राजापूर (बुवा सिद्धेश शिर्सेकर) यांनी, उत्तेजनार्थ व मांक श्री पावणाई प्रासादिक भजन मंडळ कुणकेश्वर (बुवा रविकांत घाडी) यांनी मिळविला.
स्पर्धेतील उत्कृष्ट झांजवादक वादक- राजेश चव्हाण (श्री समर्थ प्रासादिक भजन मंडळ, कुणकेश्वर- चांदेलवाडी), उत्कृष्ट कोरस – थ नीराम प्रासादिक भजन मंडळ, शिरसे- राजापूर, उत्कृष्ट तबला वादक अभिषेक सुतार (कोटेश्वर प्रासादिक भजन मंडळ, हरकुळ), उत्कृष्ट पखवाज वादक- अजित शिर्सेकर (श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, शिरसे-राजापूर), उत्कृष्ट हार्मोनियम वादक- शुभम कावले (स्वामी समर्थ भजन मंडळ, कावलेवाडी- जामसंडे), उत्कृष्ट गायक- दुर्गेश मिठबावकर (सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ, जानवली) यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण अजित सोनू गोसावी व विश्वास प्रभूदेसाई यांनी केले.
देवगड तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या मोठ्या गटात प्रथम खुशी संतोष चौकेकर (शिरगाव हायस्कूल), द्वितीय मोहित प्रताप खवळे (देवगड शेठ म. ग. हायस्कूल), तृतीय चैतन्य गुरुनाथ पाळेकर (शिरगाव हायस्कूल) यांनी यश मिळविले.
या स्पर्धेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान गटात प्रथम ओम श्रीरंग पाटणकर, द्वितीय समर्थ प्रथमेश घाडीगावकर, तृतीय दीक्षांत विश्वजीत जोशी यांनी यश मिळविले. तारामुंबरी गाव मर्यादित चित्रकला स्पर्धेत प्रथम संकेत संदीप कांदळगावकर, द्वितीय समृद्धी नीलेश खवळे, तृतीय पारस नितीन चोपडेकर, उत्तेजनार्थ- जय धाकोजी खवळे यांनी यश मिळविले.

देवगड- जामसंडे नगरपंचायत घरगुती गणपती सजावट स्पर्धेत प्रथम मयुरेश बांदकर (मळई), द्वितीय पंकज सत्यवान दुधवडकर (तरवाडी), तृतीय दीपराज मेस्त्री (मळई) यांनी यश मिळविले. या सर्व विजेत्यांना पालकमंत्री राणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. खवळे महागणपती ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत खवळे यांच्या हस्ते पालकमंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिनेश खवळे यांनी मानले.





