कणकवली : सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विभाग केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या संकल्पनेतून १९ फेब्रुवारी २०२३ सकाळी ११ वाजता कणकवली येथे जिल्ह्यातील उद्योजक मंडळी साठी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सूक्ष्म लघु मध्यम उद्योग प्रगति व विकासाच्या संधी असा या परिसंवादाचा विषय असून MSME विभाग कोण कोणत्या नवीन योजना आणत आहे. याची माहिती उद्योजकांना व्हावी. नवीन उद्योग व उद्योजक तयार व्हावेत. त्यांना मार्गदर्शन व्हावे व जिल्ह्यातील उद्योग रोजगार वाढावा हा या मागचा हेतू आहे.
या परिसंवादात स्वतः केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्योजकांच्या अडचणी, समस्या जाणून घेणे त्यांच्या विविध प्रश्नांवर उत्तर शोधणे. अधिकारी वर्ग व उद्योजक यांचा समन्वय घडवून आणणे असे अनेकविध हेतू आहेत. तरी सर्व उद्योजकांनी सकाळी ११:०० वा. कणकवली येथे उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानावर उभ्या केलेल्या सभा मंडपात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





