मालवण : शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण शहर भाजपा युवा मोर्चा व शिवप्रेमींच्या माध्यमातून शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी मालवण मोरयाचा धोंडा ते राजकोट या किनारपट्टी भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती युवा मोर्चा मालवण शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. तरी या स्वच्छता मोहिमेत शिवप्रेमी तसेच समाजिक संस्थानी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.





