कोर्टच्या प्रवेशद्वाराबाजूचा परिसर पक्ष्यांच्या विष्ठेमुळे दुर्गंधयुक्त | आठवड्यातून एकदा स्वच्छ करण्याची मागणी

सावंतवाडी : कोर्टच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या झाडावर रात्रीच्या वेळी शेकडो पक्षी निवासस्थानाला असतात. त्यामुळे त्या परिसरात त्यांची विष्ठा पडून तेथील परिसर पांढरा शुभ्र झालेला आहे. तसेच तो परिसर त्यांच्या विष्ठामुळे पूर्णपणे दुर्गंधयुक्त झालेला आहे. त्याचा त्रास फुटपाथवरून चालणाऱ्या व कोर्टात जाणाऱ्या नागरिकांना होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सावंतवाडी नगर परिषदेला विनंती करण्यात येत आहे, की सदर परिसर आठवड्यातून एकदा तरी पाण्याच्या बंबाने स्वच्छ करावा अशी मागणी केली जात आहे.