माणगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर |  ११२ रुग्णांनी घेतला लाभ

सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संलग्न श्रीवास लॅबोरेटरी क्लिनिक माणगाव आणि कलंगुटकर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर सावंतवाडी यांच्या पुढाकाराने आयुर्वेद तज्ञ डॉ. दीप्ती कळंगुटकर यांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडला. या शिबिराचा ११२ रुग्णांनी लाभ घेतला. तसेच रुग्णांना मोफत औषध उपचार वाटप करण्यात आले.

या वेळी टाळंबा प्रकल्प अध्यक्ष ऍड.किशोर शिरोडकर, माजी उपसभापती आर. के. सावंत, बाळा केसरकर, माणगाव उपसरपंच बापू बागवे, संभाजी ब्रिगेड संघटना तालुका अध्यक्ष प्रसाद नार्वेकर, डॉ. दिप्ती कळंगुटकर, सौ. सुप्रिया पाटणेकर, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर सरचिटणीस राकेश केसरकर, महीला सेल अध्यक्षा दर्शना केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, व्यापारी सेल अध्यक्ष बाळा कोरगांवकर, आनंद कांडरकर, कृष्णा सावंत, नामदेव जानकर उपस्थित होते.