शिवसेना देवगड तालुकाप्रमुखपदी अमोल लोके यांची फेरनियुक्ती

259

 

देवगड (प्रतिनिधी)

 

शिवसेना देवगड तालुकाप्रमुखपदी अमोल लोके यांची फेरनियुक्ती

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेनेचे मुख्यनेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार  शिवसेना देवगड तालुकाप्रमुख पदावर अमोल विजय लोके यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

 

अमोल लोके यांची फेरनिवड झाल्यामुळे देवगड तालुक्यात युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवकांची बांधणी चांगल्या पद्धतीने करण्याचा त्यांचा प्रामुख्याने उद्देश असून, त्या दृष्टीने ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या नियुक्तीमुळे तालुक्यात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

 

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” या ब्रीदवाक्यानुसारच आमदार निलेश राणे, रविंद्र फाटक, मार्गदर्शनाखाली काम करताना अमोल लोके सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असतात. सामाजिक उपक्रमांमधून युवकांची मजबूत टीम तयार करून त्याचा उपयोग समाजहिताच्या कार्यात तसेच पक्षबांधणीसाठी करण्याचा त्याचा मानस असतो.
                  धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणुकीप्रमाणे कार्य करताना अमोल लोके यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली युवक संघटनेचे काम अधिक प्रभावी होऊन पक्षशक्ती वाढेल, असा विश्वास वरिष्ठाना असल्यामुळे पुन्हा एक वर्षासाठी आपली फेरनियुक्ती करण्यात आली असे यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल लोके यांनी सांगितले.नियुक्तीचे पत्र नुकतेच त्यांना आमदार निलेश राणे यांनी सुपूर्द केले.यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.