सरस्वती फाउंडेशन यांच्यावतीने अत्याधुनिक वंध्वत्व उपचार व टेस्ट ट्यूब बेबी (आयव्हीएफ ) सेंटरचे नाम.नितेश राणेंच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन 

21

 

कणकवली (प्रतिनिधी)

सरस्वती फाउंडेशन यांच्यावतीने अत्याधुनिक वंध्वत्व उपचार व टेस्ट ट्यूब बेबी (आयव्हीएफ ) सेंटरचे नाम.नितेश राणेंच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी उद्घाटन 

डॉ.प्रवीण बिरमोळे व डॉ.शमिता बिरमोळे यांची माहिती 
सर्वसामान्यांसाठी माफक दरात गुरुकृपा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात सेवा उपलब्ध करून दिली जाणार
कणकवली शहरातील गुरुकृपा मल्टिस्पेशालिटी रुग्णालय गेली २७ वर्षे रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देत आहे. हे रुग्णालय तसेच सरस्वती फाउंडेशन यांच्यावतीने मोठ्या शहराप्रमाणेच अत्याधुनिक वंध्वत्व उपचार व टेस्ट ट्यूब बेबी (आयव्हीएफ ) केंद्र सुरू करण्यात आले आहे. सर्वसामान्यांसाठी माफक दरात याठिकाणी सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती गुरुकृपा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ.प्रवीण बिरमोळे व डॉ.शमिता बिरमोळे यांनी दिली.

 

गुरुकृपा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयातील अद्ययावत सेवेबाबत प्रसिध्दी माध्यमांना त्यांनी माहिती दिली. यावेळी डॉ. भारती सावंत, सुधाकर सावंत उपस्थित होते.डॉ.शमिता बिरमोळे म्हणाल्या,१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन व श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्यसाधून दुपारी ३ वाजता या सेंटरचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
तसेच जिल्हाधिकारी अनिल पाटील, अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे-इंगवले, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री उपस्थित राहणार आहेत.या शुभारंभ सोहळ्याच्यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. शमिता बिरमोळे यांनी केले.
तसेच मुंबई,पुणे यासारख्या मोठ्या शहरात रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य विषयक सुविधा सिंधुदुर्गातील जनतेला मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न आहेत.त्यासाठी अत्याधुनिक यंत्र सामुग्री आमच्या रुग्णालयात आणण्यात आल्या आहेत. त्याद्वारे रुग्णांना चांगली सेवा दिली जात आहे. विविध शासकीय योजनांअंतर्गत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कॅन्सर तसेच स्त्रियांच्या विविध आजारांबाबत समाजात जागृती होणे आवश्यक असून त्यांनी वेळीच उपचार घेवून निरोगी जीवन जगावे यासाठी विविध ठिकाणी प्रबोधन वर्ग घेण्याचा आमचा मानस आहे. असेही डॉ.शमिता बिरमोळे यांनी सांगितले.