प्राणजीवन सहयोग संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – सरपंच प्रिया गोलतकर
वरेरी येथे प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल मार्फत मोफत रेनकोट वाटप
प्राणजीवन सहयोग संस्थेचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असुन जिल्हातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अंगणवाडी व पहिली ते चौथी पर्यंतच्या विदयार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात येत असुन निश्चितच प्राण जीवन सहयोग संस्थेने विदयार्थ्यांना पावसाळ्यात एक चांगली भेट दिली असुन संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी जोपासलेले समाजसेवेचे व्रत सर्वांनाचा प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्वार वरेरी सरपंच प्रिया गोलतकर यांनी काढले .
वरेरी ( देवगड )गांवठण अंगणवाडी येथे प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर व जिल्हा प्रतिनिधी प्रशांत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरेरी सरपंच प्रिया गोलतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत रेनकोट वाटप करण्यात आले .
यावेळी शिक्षक किशोर धांडे सर , सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल गोलतकर , वरेरी अंगणवाडी सेविका शुभांगी धुरी, मदतनीस अक्षता सावंत , विनायक धुरी , पालक विभावरी घाडी , रिद्धीमा थोटम , नेहा सावंत , सई सावंत आदींच्या उपस्थितीत रेनकोट वाटप करण्यात आले .
प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल कणकवली संस्थेने या आधीही आपल्या सामाजिक कार्यातुन नागरीकांना मदत केली असुन शाळेतील विदयार्थ्यांना वहया वाटप असो किंवा कोरोना काळात सिंधुदूर्गात मोफत सॅनिटायझर फवारणी तसेच रूग्नांना फळे वाटप व वाफेची मशिन वाटप करण्यात आली होती . या वर्षी प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल कणकवली यांच्या मार्फत कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ शालेय विदयार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप होत आहे.