शिवजयंतीनिमित्त सावंतवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन…!

107

सावंतवाडी : रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंतीनिमित्त स्वराज्य युवा मित्रमंडळ दांडेली, कोंडुरा तिठा, आरोस. तालुका सावंतवाडी, आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा – सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच SSPM रक्तपेढी, पडवे यांच्या सहकार्याने आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल आरोस, कोंडुरा तिठा, तालुका – सावंतवाडी येथे ८:३० ते दुपारी १२:३० या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी रक्तदान करण्यासाठी इच्छूक रक्तदात्यांनी स्वराज्य युवा मित्रमंडळाशी संपर्क साधावा व शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान – सिंधुदूर्ग, तालुका कार्यकारिणी – सावंतवाडी यांनी केले आहे.