२६ फेब्रुवारीला सब ज्युनिअर ॲथलेटिक्स् निवड चाचणी स्पर्धा…!

कणकवली : जिल्ह्यातील मुला मुलींना ॲथलेटिक्स् (मैदानी) स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. याकरीता महाराष्ट्र ॲथलेटिक्स् असोसिएशनच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन, सिंधुदुर्गच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय सब ज्युनियअर ०६/०८/१०/१२ वर्षा खालील मुला- मुलींच्या अँथलेटिक्स् (मैदानी) निवड चाचणी स्पर्धा २०२२-२३ दि. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी येथे कणकवली, कुडाळ किंवा ओरोस येथे घेण्यात येणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, क्रीडा मंडळ, संस्था या स्पर्धेत सहभाग घ्यावा. या स्पर्धेतील मुला मुलींची राज्यस्तरीयसाठी निवड करण्यात येईल. राज्यस्तरीय स्पर्धा कोल्हापुर येथे होणार आहेत, सब ज्युनियर ॲथलेटिक्स् स्पर्धा क्रीडा प्रकार व वयोगट –

१) वयोगट : ६ वर्षा खालील- मुले / मुली ( १२/०२/२०१७ ते ११/०२/२०२०), ३० मी.धावणे, ५० मी.धावणे.               २) वयोगट : ८ वर्षा खालील- मुले / मुली ( १२/०२/२०१५ ते ११/०२/२०१७ ), ५० मी.धावणे, ८० मी धावणे, लाब-             ऊडी, ४ x ५० मी. शेटल रीले .                                                                                           ३) वयोगट : १० वर्षा खालील- मुले / मुली ( १२/०२/२०१३ ते ११/०२/२०१५ ), ५० मी.धावणे, १००मी धावणे, लांब-          ऊडी, गोळा-फेक, ४ x १०० मी रीले.                                                                                       ४) वयोगट : १२ वर्षा खालील- मुले / मुली ( १२/०२/२०११ ते ११/०२/२०१३), ६० मी.धावणे, २०० धावणे, लांब-ऊडी,        ऊंच ऊडी, गोळा फेक, ४ x १०० मी.रीले.

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांनी व मुलींना सहभागी होण्यासाठी अहवान संघटनेचे अध्यक्ष रणजितसिंग राणे यांनी केले.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी संपर्क सह. सचिव समीर ज. राऊत, बिडयेवाडी, दत्त मंदिर जवळ, कलमठ, कणकवली, जि. सिंधुदुर्ग, दूरध्वनी क्र. ७९००१९७४७५ / ८९२८८८३५९४. वेळ : स. १० ते १ व साय ४ ते ७ महिला तालूका प्रशिक्षकप्रमुख अंजली जयसिंग गायकवाड, निवड प्रमुख व पंच प्रमुख शबाळकृष्ण कदम, क्रिस्टल राॅडरीक्स (एन. आय. एस कोच), रुपेश वाळके, तेजस्वीनी नाईक, माधुरी खराडे, अजय सावंत सर, सुवर्णा जोशी. स्पर्धेची नोंदणी अंतिम तारीख २२ फेब्रुवारी आहे.