शिवजन्मोत्सवा निम्मित शिवतेज संस्थेचे विविध कार्यक्रम…!

 

 शिवजन्मोत्सव सोहळा २०२३

शिवतेज सेवा संस्था सिंधुदुर्ग, बांदा ,ही संस्था शिवाजी महाराजांचे विचार घराघरात व मनामनात पोहचविण्यासाठी तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आहे. दरवर्षी आमची संस्था वेगवेगळ्या शाळांमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करते. यावर्षी आमच्या संस्थेतर्फे शिवजन्मोत्सव सोहळा रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी जि.प. शाळा बावळाट येथे साजरा होणार असून या कालावधीत शालेय विदयार्थ्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

शिवतेज सेवा संस्था सिंधुदूर्ग,बांदा,तर्फे विदयार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी, त्यांचे मनोबल धैर्य वाढावे, व्यासपीठ मिळावे तसेच छत्रपती शिवाजी महाराज घराघरातुन प्रत्येक मुलाच्या मनात पोहचावे यासाठी चित्रकला व वेशभुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजन्मोत्सव साजरा झाल्यावर सकाळी ठिक ९.३० वाजता होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी बक्षिस वितरणाचा सोहळा संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी र्स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे. सदरच्या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

 चित्रकला स्पर्धा – रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी

       वेळ- सकाळी ठिक १०.०० वा. स्थळ- जि.प. शाळा बावळाट

१) पहीली ते चौथी : विषय – छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले

२) पाचवी ते सातवी : विषय- छत्रपती शिवाजी महाराज व मावळे

३) आठवी ते दहावी :  विषय- छत्रपती शिवाजी महाराजांचे गड व संवर्धन

 वेशभूषा स्पर्धा – रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी

वेळ- दुपारी ठिक ०२.३० वा, स्थळ – जि.प. शाळा बावळाट

१) पहीली ते चौथी :  विषय – ऐतिहासिक / छत्रपती शिवाजी महाराज / मावळे/जिजाऊ

2) पाचवी ते सातवी : विषय – ऐतिहासिक / छत्रपती शिवाजी महाराज / मावळे/जिजाऊ

३) आठवी ते दहावी : विषय – ऐतिहासिक / छत्रपती शिवाजी महाराज / मावळे / जिजाऊ

स्पर्धेच्या अटी व नियम –
१) चित्रकला स्पर्धेसाठी स्पर्धकांना कागद आयोजकांतर्फे देण्यात येईल.

२) कलर व इतर सर्व साहित्य स्पर्धकांनी स्वतः घेऊन यावे.

३) चित्रकला स्पर्धेसाठी स्ट्रेसिंगचा वापर करू नये.
४) चित्रकला स्पर्धेचा वेळ 2.30 तास राहील.
५) वेशभूषा स्पर्धेमध्ये सादरीकरणासाठी गुण राहतील.
६) वेशभूषा स्पर्धेसाठी ५ मिनिटे सादरीकरणाचा वेळ राहील.
७) एक स्पर्धक दोन्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकेल.
प्रथम क्रमांक :- सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र ,भेटवस्तू
द्वितीय क्रमांक :-  सन्मानचिन्ह, सन्मानपत्र , भेटवस्तू

तृतीय क्रमांक :-  सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र, भेटवस्तू

  • सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मान चिन्ह देण्यात येईल.
  • सहभागी स्पर्धकांनी नावे खालील दिलेल्या नंबरवर नाव, शाळा, गट, इयत्ता,  विषय,मोबाईल क्रमांक या स्वरुपात दयावीत. किवा Whatsapp करावी.
    संपर्क्र कमांक :-  तेजस परब : 9421083131 , संतोष मंजिलकर : 9404746896                          अनोज बांदेकर : 9923824270, लक्ष्मण कळंगुटकर 99308677 66