बांदा : भालावल (धनगरवाडी) येथे कोकरे परिवार देवीचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव मंगळवारी १४ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होणार आहे.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी ३ वाजता देवी पुजन, सायंकाळी ४ वाजल्यापासून देवीची ओटी सुरुवात. रात्री ८ वाजल्यापासून भोजनाचा कार्यक्रम,रात्री १० वाजता गोंधळोत्सव कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविकांनी कार्यक्रमांस उपस्थित राहून शोभा वाढवावी. असे आवाहन देवस्थान पुजारी बाबू कोकरे, लक्ष्मण कोकरे यांनी केले आहे.





