बांदा : महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या वतीने जागृत पालक सुदृढ बालक हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. यात o ते 18 वयोगटातील 3995 बालकांची तपासणी होणार आहे. यासाठी 15 कर्मचाऱ्यांच्या तीन टीम कार्यरत आहेत.
ग्रामीण भागासाठी समुदाय आरोग्य टीम ,राष्ट्रीय बालक सुरक्षा टीम या सर्वांवर देखरेख ठेवण्यासाठी एक विशेष भरारी पथक आरोग्य केंद्र टीम. अशा वेगवेगळ्या टीम मार्फत ही आरोग्य तपासणी होणार आहे. या शासनाच्या अभियानाला चांगला असा प्रतिसाद मिळत आहे.





