पिंगुळी वड गणेश मंदिर इथं डंपर – मोटरसायकलचा अपघात…

128

कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी वड गणेश येथे डंपर आणि दुचाकी स्वार यांच्यात धडक झाली असून मोटर सायकल स्वार या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. डंपरची धडक एवढी जोरदार होती की मोटरसायकलचा चक्काचूर झाला आहे.

ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी गाडीकडे धाव घेत डंपर पकडला या अपघातात मोटरसायकल स्वाराला गंभीर दुखापत झाली असून त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास पुढे पोलीस करत आहेत.