आशियाई कराटे स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी केली ऐतिहासिक कामगिरी ; १ सुवर्णसह २ कांस्य पदके जिंकली
उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या २१ व्या AKF आशियाई वरिष्ठ कराटे चॅम्पियनशिप आणि चौथी AKF आशियाई पॅरा-कराटे चॅम्पियनशिप, २०२५ मध्ये भारतीय कराटे खेळाडूंनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरी करीत जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे अशी माहिती कराटे इंडिया ऑर्गनायझेशन (KIO) चे समन्वयक तथा भारतीय संघ प्रशिक्षक संदीप गाडे यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.
प्रतिष्ठित आशियाई चॅम्पियनशिपचे आयोजन आशियाई कराटे फेडरेशन (AKF) द्वारे करण्यात आले होते, ज्याला ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशिया (OCA) द्वारे मान्यता प्राप्त आहे. AKF हा जागतिक कराटे फेडरेशन (WKF) चा सदस्य आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) द्वारे मान्यता प्राप्त आहे.या स्पर्धेत २९ देशातील ४०० कराटेपट्टुंनी आपापल्या देशाचे नेतृत्व केले होते.यावर्षी भारतीय चमूतील बहुतांश खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी केली असून या खेळाडूंच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल कराटे इंडिया ऑर्गनायझेशने अभिनंदन केले .
*पदकांचे मानकरी पुढीलप्रमाणे -*
श्री तरुण शर्मा – पॅरा-कराटे वैयक्तिक काता मध्ये सुवर्णपदक (श्रेणी के-२१) सुश्री अलिशा – महिला वैयक्तिक कुमिते मध्ये कांस्यपदक -५५ किलो वजन गट सुश्री भुवनेश्वरी जाधव – महिला वैयक्तिक कुमिते मध्ये कांस्यपदक -(६८ किलो वजन गट)भारतीय कराटेसाठी ऐतिहासिक आणि पहिलेच तरुण शर्मा यांनी पॅरा-कराटे मध्ये सुवर्णपदक जिंकले, जे आशियाई स्तरावर या श्रेणीत भारतासाठी एक अभूतपूर्व कामगिरी आहे.
कराटे इंडिया ऑर्गनायझेशन सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांचे त्यांच्या अथक समर्पणाबद्दल आणि कठोर परिश्रमाबद्दल विशेष कौतुक होत आहे .नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतल्यानंतर , खेळाडूंचे केआयओचे अध्यक्ष भरत शर्मा आणि इतर अधिकाऱ्यांनी सर्व पदक विजेते व अधिकारीवर्गांचे जंगी स्वागत केले आणि कौतुकाचे प्रतीक म्हणून , प्रत्येक पदक विजेत्याला १,५१,०००/- (भारतीय रुपये एक लाख एकावन्न हजार ) जाहीर करण्यात आले.
श्री भरत शर्मा यांनी भारतीय संघ प्रमुख, कोच, मॅनेजर इत्यादी सहयोगी अधिका-यांच्या प्रयत्नांचे देखील तोंडभरून कौतुक केले.भारतीय संघाचे प्रमुख- श्री संजीव कुमार जांगरा, सरचिटणीस केआयओ राष्ट्रीय महासंघाचे अधिकारी सलाउद्दीन अन्सारी आणि महेश कुशवाह,संघ प्रशिक्षक-कीर्तन कोंडुरु, संदीप गाडे, सावन कुमार आणि भरत यादव,संघ व्यवस्थापक-अभय अतुल, यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय कराटेची वाढती ताकद आणि आंतरराष्ट्रीय मान्यता अधोरेखित होते, जी आमच्या खेळाडूंच्या सातत्यपूर्ण विकास आणि जागतिक स्पर्धात्मकतेचे प्रतिबिंब आहे असे गौरवोद्गार काढले.