वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य असा रेडी गाव आणि त्या गावातील यशवंत गड गेली कित्येक वर्षे स्थानिक शिवप्रेमी संवर्धन करत आहेत. ११ आणि १२ फेब्रुवारीला शिवप्रेमींकडुन मोठी संवर्धन मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक भटकंती शिवप्रेमी आणि स्थानिक जिल्ह्यातील शिवप्रेमी संघटनेने सहभाग घेतला होता.
तसेच शिवप्रेमी ने संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हावासीयांना आवाहन करण्यात आले की श्री छत्रपती शिवाजी महाराज जरी आज आपल्यात नसले तरीही ते आज गड किल्ल्याच्या स्वरूपात जिवंत आहेत. ह्या गड किल्ल्यावर किती तरी मावळ्यांनी आपले रक्त सांडले आपल्याला सुंदर असे स्वराज्य मिळावे त्यासाठी त्यांनी कार्य केले.
त्यामुळे त्या गड किल्ल्यांचे संवर्धन करा जेणेकरून पुढील पिढीला आपला इतिहास कळेल. यावेळी ऐतिहासिक भटकंती शिवप्रेमी, रेडी शिवप्रेमी, सह्याद्री दुर्गसेवक शिवप्रेमी आणि शिवप्रेमी सिंधुदुर्ग उपस्थित होते.





