गिरणी कामगारांच्या मुंबईतील नियोजित गृहनिर्माण संकुलाच्या नामफलकाचा गुढीपाडव्याला शुभारंभ – प्रकाश नाईक

18

 

कणकवली (प्रतिनिधी)

 

गिरणी कामगारांच्या मुंबईतील नियोजित गृहनिर्माण संकुलाच्या नामफलकाचा गुढीपाडव्याला शुभारंभ – प्रकाश नाईक

गिरणी कामगारांच्या मुंबईतील वडाळा-शिवडी भक्ती पार्क येथील नियोजित गृहनिर्माण संकुलाच्या नाम फलकाचा शुभारंभ येत्या गुढीपाडवा दिनी रविवार दि. ३० मार्चला दुपारी ३.३० वाजता होणार आहे, अशी माहिती गिरणी कामगार वारस उत्कर्ष संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावेळी गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी सहकार्य करणारे सम्राट अशोक टुरिझमचे चेअरमन , माजी समाज कल्याण अधिकारी, मेक इन इंडियाचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी अशोक बाबुराम कदम, त्यांचे सहकारी उपस्थित रहाणार आहेत, अशीही माहिती, नाईक यांनी या पत्रकात दिली आहे.
आम्ही शिवडी-वडाळा भक्ती पार्क येथील नियोजित गृहनिर्माण संकुलात गिरणी कामगारांना हक्काची घरे काही प्रमाणात उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती सम्राट टुरिझमचे अशोक कदम यांच्याकडे केली होती. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता या संकुलाचा भूभाग आमच्या संघटनेच्या ताब्यात आला आहे, असे पत्रकात नमूद करुन त्यांनी गुढीपाडव्याच्या दिनी होणार्या या नाम फलकाच्या शुभारंभ कार्यक्रमास संघटनेच्या सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.