कै . राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविले विविध पदार्थ

129

 

कणकवली ( प्रतिनिधी)

कै . राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविले विविध पदार्थ

कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांनी उद्यानविद्या विभागाअंतर्गत काढणी पश्चात तंत्रज्ञान वापरुन विविध पदार्थ बनविण्यात आले. यामधे नारळ बिटाच्या वड्या, आवळा लोणचे, कोकम सरबत, लिंबू सरबत, बटाटा चिप्स, पपई जाम , टोमॅटो केचप आदी पदार्थांचा समावेश होता. या पदार्थांना बाजारात उत्तम भाव मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध योजना राबवून त्यातून ग्राहकांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी अननस सरबत, पपई जाम, पेरू जेली व टुटीफुटी, टोमॅटो केचप, इ. पदार्थ बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल सुरू केली आहे. बाजारातून फळ आणून त्यावर प्रक्रिया करुन शेवटी मिळणारा पदार्थ दीर्घकाळ टिकणारा असतो, त्यातून फायदेशीर उत्पन्न मिळते याबद्दलचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले. स्वतःचा व्यवसाय उभारण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य. श्री पंकज संते, कार्यक्रम प्रभारी प्रा. रुपाली ढोले, विभाग सहायक प्रशांत तेली तसेच संस्था अध्यक्ष श्री. दिपेश मराठे व संस्थेच्या कायदेशीर सल्लागार सौ. मिताली मराठे,संचालक जनार्दन देसाई ,संचालिका विद्या राणे यांचे मार्गदर्शन लाभले