बांदा : मालवण काळसे होबळीचा माळ, येथे काळसे रमाईनगर येथील रहिवासी 5 गरीब महिला शेतातील मोलमजूरीचे काम आटोपून आपले घरी रस्त्याने चालत जात असताना भरधाव वेगातील व दारुच्या नशेतील डंपर चालकाने त्यांना धडक देवून अपघात केला. त्यात रुक्मिणी पांडूरंग काळसेकर, वय 65 हिचे जागीच निधन झाले. तसेच या मध्ये दिव्या दिपक काळसेकर, वय 43 हिच्या उजव्या पाय फ्रेंक्चर होवून तिला गंभीर दुखापत झाली आहे तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.
या मृत झालेल्या महिलेचा मुलगा दिपक पांडूरंग काळसेकर याचेवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्याची पत्नी सौ. दिव्या दिपक काळसेकर ही गंभीर दुखापतग्रस्त आहे. तिला दोन लहान मुले आहेत. तर वडील वयोरुद्ध असून आजारी आहेत. तसेच त्याच्या बहिणीचे पती कोरोना काळात मृत्युमुखी झाल्याने ती बहिण आणि त्या बहिणीची लहान मुलगी अशा सर्वांची जबाबदारी दिपक पांडूरंग काळसेकर याचेवर आहे.
त्यांची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तरी सर्व दात्यांना आपआपल्या परिने शक्य ती आर्थिक मदत खालील नमूद दिलेल्या बँक खाते क्रमांकावर जमा करावी.
खातेदाराचे नाव – सौ. दिव्या दिपक काळसेकर बँक – केनरा (Canara) बँक, शाखा – धामापूर, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. खाते क्रमांक- 53762200036560 | IFSC कोड – CNRB0015376 मोबा क्रमांक- 8275798643 (प्रमोद बाळकृष्ण काळसेकर) रा. काळसे, ता. मालवण मोबा. क्र. 8605798643




