कणकवली (प्रतिनिधी)
रिगल कॉलेजची विद्यार्थीनी कु.सुचिता राणे एस.एन. डी. टी विद्यापिठात प्रथम
सुचिता राणे हिला कांता ढेपे यांच्याकडून गोल्ड मेडल
शैक्षणिक वर्ष एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन ची विद्यार्थीनी कु. साक्षी विनायक चौंबे हिने एस.एन.डी.टी विद्यापीठात प्रथम क्रामांक मिळविला. तसेच कांता ढेपे यांच्याकडून गोल्ड मेडल देण्यात आले. तसेच कु.सुचिता राणे हिने तृतीय वर्ष बी.सी.ए मध्ये एस.एन. डी.टी विद्यापिठात चतुर्थ क्रमांक पटकावला.
कु. साक्षी विनायक चौंबे हिचे प्राथमिक शिक्षण साकेडी प्राथमिक शाळा येथे तर १०वी व १२वी चे शिक्षण एस.एम. हायस्कूल कणकवली येथे पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी रिगल कॉलेज कणकवलीमधील एस.एन.डी.टी विद्यापीठ बी.सी.ए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तीन वर्षाच्या कोर्समध्ये तिने तृतीय वर्षातील एस.एन.डी.टी विद्यापीठाच्या २०२३ -२४ मध्ये झालेल्या सेमिस्टरमध्ये १००० गुणांपैकी ८३८ गुण मिळवुन “०” ग्रेड प्राप्त करून विद्यापिठात प्रथम क्रमांकासह मोल्ड मेडल पटकावले. ग्रामीण भागात शिक्षण घेऊन तिने कठोर परिश्रम करून उल्लेखनिय कामगिरी करून दाखविली. कु. सुचिता देविदास राणे हिने १०वी व १२वी चे शिक्षण खानापूर बेळगाव येथे झाले. पुढील शिक्षणासाठी रिगल कॉलेज कणकवलीमधील एस.एन.डी.टी विद्यापिठाच्या बी.सी.ए अभ्यासक्रमाला चतुर्थ क्रमांक पटकावला.





