उमेद अभियान अंतर्गत प्रेरणा प्रभाग संघ कोलगावची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

17

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

उमेद अभियान अंतर्गत प्रेरणा प्रभाग संघ कोलगावची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

उमेद अभियान अंतर्गत प्रेरणा प्रभाग संघ कोलगावची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. ग्रामपंचायत आंबेगाव या ठिकाणी प्रेरणा प्रभाग संघ कोलगावची 2023 24 ची वार्षिक सभा संपन्न झाली. या सभेला अतिथी म्हणून ग्रामपंचायत आंबेगावचे सरपंच शिवाजी परब, उमेदचे तालुका व्यवस्थापक शिवानंद गवंडे तळवडे प्रभागाचे प्रभाग समन्वयक सचिन नाईक तसेच आंबेगावच्या माजी सरपंच सौ वर्षां वरक उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षस्थान प्रभाग संघाच्या सचिव सौ दीपिका दत्ता राऊळ यांनी भूषविले.या सभेत झालेले कामकाज
2022-23 च्या वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून संमत करण्यात आले. जमाखर्चाला मंजुरी घेण्यात आली.

वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.‌ उत्कृष्ट ग्रामसंघाचा सत्कार करताना चैतन्य ग्रामसंघ, भोम, सातेरी ग्रामसंघ, कोलगाव, श्री देव हेळेकर ग्रामसंघ, कारिवडे पेडवेवाडी यांसह प्रत्येक ग्राम संघातील दोन उत्कृष्ट समुहाचा सत्कार करण्यात आला. वर्षभर संघटनात्मक काम करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सीआरपी, बँक सखी तसेच ग्रामसंग लिपिका व प्रभाग संघ लेखापाल यांनाही गौरविण्यात आले.

सभेची सुरुवात इतनी शक्ती देना या सामूहिक प्रार्थनेने व दीप प्रज्वलनाने सर्व सीआरपी ने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीताने स्वागत केले‌. आभार प्रदर्शन सौ सविता कासार यांनी मानले. सभेची सांगता वंदे मातरम राष्ट्रगीताने झाली.सभेचे सूत्रसंचालन सौ.दीक्षा मेस्त्री यांनी केले. ही सभा संपन्न करण्यासाठी श्री देव क्षेत्रपाल ग्रामसंघ, आंबेगाव यांनी विशेष प्रयत्न केले.