मळगाव येथे माघी गणेश जयंती उत्सव…

6

 

सावंतवाडी (प्रतिनीधी) 

मळगाव येथे माघी गणेश जयंती उत्सव…

सुधीर भागवत गुरुजी मळगाव तेलीवाडा येथील गणेश मंदिरात १ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजता अभिषेक नित्यपूजा,सकाळी ९ वाजता श्री सत्यविनायक महापूजा, दुपारी १२ वाजता आरती, तीर्थप्रसाद, दुपारी १२.३० ते ३ वाजता महाप्रसाद तसेच संध्याकाळी स्थानिकांचे भजन व फुगडी कार्यक्रम, रात्री ८ वाजता ह.भ.प.सौ.मृणाल गावंकर प्रभूदेसाई यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे, सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन भागवत गुरुजी यांनी केले आहे.