सावंतवाडी (प्रतिनीधी)
मंत्री नितेश राणे यांचा 4 जानेवारी रोजी आंबोली दौरा
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश नारायण राणे आंबोली मध्ये शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता हिंदू धर्म परिषदच्या कार्यक्रम साठी येणार आहेत.
पूर्ण महाराष्ट्रभर हिंदुत्ववादी नेता म्हणून ज्यांची ओळख आहे असे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे हे 4 जानेवारी रोजी आंबोली दौऱ्यावर येत आहेत.आंबोली पंचक्रोशी तील सर्व हिंदुत्ववादी जनता व भाजपा महायुती च्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी स्वागतासाठी शनिवारी सकाळी ९ वाजता आंबोली पोलीस चेक पोस्ट जवळ उपस्थित राहावे.
आंबोली चेक पोस्ट च्या येथून स्वागत झाल्यावर आंबोली कामतवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे हिंदू धर्म परिषद च्या कार्यक्रमासाठी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी केले आहे.





