ॲड. अमेय गुमास्ते यांची नोटरी पदी नियुक्ती

35

 

देवगड प्रतिनीधी

ॲड. अमेय गुमास्ते यांची नोटरी पदी नियुक्ती

देवगड येथील ॲड. अमेय गुमास्ते यांची भारत सरकार च्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरी पदी नियुक्ती केली आहे . ॲड. गुमास्ते हे देवगड येथील प्रसिद्ध दिवाणी व फौजदारी विधीज्ञ असून ते आता केंद्र सरकारद्वारा संपूर्ण देवगड विभागासाठी नोटरी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. मागील १७ वर्षात त्यांनी अनेक दिवाणी व फौजदारी खटले यशस्वीरित्या हाताळले आहेत . ॲड. अमेय गुमास्ते यांचे वडील प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात न जाता अमेय गुमास्ते यांनी वकिली क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यांना सुरुवातीपासूनच आवड असल्याने त्यांनी वकिली व्यवसायत गेल्या 17 वर्षापासून देवगड वासियांना सेवा दिली आहे. ऍड. गुमास्ते यांची नोटरी पदावर नियुक्ती झाल्याने आता करार , शपथपत्रे . कुलमुखत्यारपत्र इत्यादी दस्त साक्षांकित करण्यासाठी देवगड मधील जनतेला सुविधा उपलब्ध झाली आहे.