देवगड (स्वप्नील लोके)
देवगड हे माझे मॅगनेट आहे, त्यामुळे प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण देवगडचा विकासासाठी – मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे
देवगडचा मंत्री होत नाही हा देवगड तालुक्यावर बसलेला ठपका मला मंत्रीपद मिळाल्याने पुसून काढला आहे. देवगडवासियांने निस्वार्थीपणे प्रेम केले. माझामध्ये आणि देवगडवासियांमध्ये काहींनी फुट पाडण्याचा प्रयत्न केला मात्र ते घरी बसले नी मी मंत्री झालो.त्यावेळी विरोधी आमदार असूनही देवगडवासियांनी मला साथ दिली आता मंत्री झाल्याने पाच वर्षे स्वस्थ राहा. देवगडवासियांच्या अपेक्षा व इच्छा, विकासकामे पुर्ण करून देण्यासाठी मी कटिबध्द आहे अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली.
त्याचबरोबर देवगड हे माझे मॅगनेट आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण देवगडचा विकासासाठी देणार असून मला बंदर व मत्स्योद्योग मंत्रीपदाची दिलेली जबाबदारी ही देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर असो, विजयदूर्ग बंदर असो वा मच्छिमारांचे प्रश्न असो ते सोडविण्यासाठी पार पाडेन.
माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार यांना अपेक्षित असलेला देवगड विकसित करेन असे प्रतिपादन राज्याचे मत्स्योद्योग व बंदरविकास मंत्री ना.नितेश राणे यांनी केले.ना.नितेश राणे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर आज देवगड तालुक्यात आगमन होताच त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.






