मळेवाड शाळेच्या वर्ग दुरुस्तीच्या कामाच्या माजी विद्यार्थी वैभव मोरुडकर यांच्या हस्ते शुभारंभ

193

 

सावंतवाडी (हेमंत मराठे)

मळेवाड शाळेच्या वर्ग दुरुस्तीच्या कामाच्या माजी विद्यार्थी वैभव मोरुडकर यांच्या हस्ते शुभारंभ

     मळेवाड शाळा नंबर 2 च्या वर्ग खोली दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ शाळेचे माजी विद्यार्थी वैभव मोरुडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडे श्री कुलदेवता विद्यामंदिर मळेवाड शाळा नंबर 2 ची वर्ग खोली पूर्णपणे मोडकळीस आली असल्याने या प्रशालेचे मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समितीने सदर वर्ग खोलीची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. त्या नंतर सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरंचपद हेमंत मराठे यांनी या वर्ग खोलीच्या दुरुस्ती करीता तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी करत त्याचा पाठपुरावा करून जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 4 लाख रुपये निधी मंजूर करून आणला. या कामाचा शुभारंभ प्रशालेचे माजी विद्यार्थी वैभव मोरूडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरंचपद हेमंत मराठे, कृषी मित्र अमित नाईक, ग्रामपंचायत सदस्य मधुकर जाधव,मुख्याध्यापक लवु सातार्डेकर, ठेकेदार प्रशांत परब, बाळा नाईक आदी उपस्थित होते.