जामसंडे येथील गोगटे हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ 

13

 

देवगड (प्रतिनिधी)

जामसंडे येथील गोगटे हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ 

जामसंडे येथील श्री.मो.गोगटे प्रशालेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ संस्थाध्यक्ष माजी आमदार ॲड.अजित गोगटे यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाला.याप्रसंगी क्रीडासमिती अध्यक्ष प्रशांत बारीक ,मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव ,संस्था सचिव-प्रवीण जोग ,सुभाष धुरी ,क्रीडा शिक्षक श्री.मृत्युंजय मुणगेकर ,श्री.पराग हिरनाईक ,श्री.मोहन सनगाळे ,श्री.गुरु पवार आदि मान्यवर उपस्थित होते.
श्रीफळ वाढवून क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन ॲड.अजितराव गोगटे यांनी केले.उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक श्री.सुनील जाधव यांनी केले.याप्रसंगी क्रीडाशिक्षक श्री.मोहन सनगाळे यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.
आठ दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक खेळात( मैदानी) १०० मीटर धावणे,२०० मीटर धावणे ,मिडी बॉल ,गोळा फेक,दोरी उड्या,सुर्य नमस्कार ,जागेवर लांब उडी,स्लो सायकलिंग,तर सांघिक खेळामध्ये खो खो,कबड्डी ,हॉलिबॉल, रिले ,इनडोअर खेळामध्ये -कॅरम ,व बुद्धिबळ ,अशा क्रीडाप्रकारात स्पर्धा होणार आहेत .
या संपूर्ण स्पर्धा क्रीडाशिक्षक श्री.मृत्युंजय मुणगेकर ,श्री.पराग हिरणाईक, मोहन सनगाळे, सौ.समीरा राऊत ,मंगेश गिरकर, संजीवनी जाधव ,प्रज्ञा चव्हाण ,विनायक जाधव व सतीश करले,ह्या स्पर्धा घेणार आहेत .जिल्हा,विभाग,व राज्यस्तरीय स्तरावर दैदीप्यपमान कामगिरी करणारे खेळाडू गोगटे संकुलात घडवले जातात.