Home देवगड अरुंद रस्त्यामुळे दोन एसटींची समोरासमोर धडक ; मोंड येथील घटना 

अरुंद रस्त्यामुळे दोन एसटींची समोरासमोर धडक ; मोंड येथील घटना 

27

 

देवगड / प्रतिनिधी

 

अरुंद रस्त्यामुळे दोन एसटींची समोरासमोर धडक ; मोंड येथील घटना 

 

मोंड हायस्कूलनजीक एका अरुंद रस्त्यावर दोन एसटींची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात एसटीतील काही शालेय विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. हा अपघात बुधवारी सायंकाळी ५ वा. च्या सुमारास घडला. या मार्गावरील एसटी अपघाताची ही तिसरी घटना आहे.

 

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, देवगड एसटी आगाराची देवगड वानिवडे ही बसफेरी मोंड हायस्कूलमार्गे वानिवडेच्या दिशेने जात होती. सायंकाळी ५ वा. च्या सुमारास मोंड हायस्कूलनजीकच्या एका अरुंद उताराच्या रस्त्यावरील अवघड वळणावर ही बसफेरी आली असता समोरून आलेल्या विजयदुर्ग- वैभववाडी या बसफेरीची धडक देवगड- वानिवडे बसफेरीला बसली.

या मार्गावरील अवघड वळणावर घडलेल्या या अपघातादरम्यान दोन्ही चालकांनी एसटी गाड्यांवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने अपघाताची भीषणता टळली. तरीही या धडकेत एसटींमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. इतर प्रवाशांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. दोन्ही एसटी गाड्यांच्या दर्शनी भागाचे किरकोळ नुकसान झाले. हा मार्ग अरुंद स्वरुपाचा असून चढउताराचा आहे. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेल्या झाडांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.