कणकवली : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याची बैठक शिक्षण उपसंचालक महेश चोथे, कोल्हापूर सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांच्या समवेत झाली. ही चर्चा कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य महासचिव नामदेवराव कांबळे व कार्याध्यक्ष गणेश मडावी यांच्या उपस्थितीत प्राथमिक व माध्यमिक विभागाकडील मागासवर्गीय शिक्षकांच्या विविध प्रश्नावर आयोजित करण्यात आली होती.
सदर सहविचार सभेत प्रत्येक जिल्हय़ातील माध्यमिक शाळा संस्थेच्या रोस्टर विभागीय आयुक्त (मागास कक्ष) कार्यालया मधून तपासणी करणे बाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिली आहे,प्रत्येक संस्थेमध्ये अनुशेष भरती करण्याबाबत व अनुकंपा भरती करण्याबाबत चर्चा झाली आहे.अनेक संस्थांमध्ये मुख्याध्यापक पद देत असताना मागासवर्गीय शिक्षकांना डावलून कनिष्ठ असलेल्या शिक्षकांना प्रभारी व मुख्याध्यापक पद दिले जाते आणि मागासवर्गीय शिक्षकांवर खोट्या प्रकरणा मध्ये जाणीवपूर्वक अडकवून मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक पदापासून वंचित ठेवले जाण्याचे अनेक प्रकार सर्वच जिल्ह्यांमध्ये घडत आहे.
सदर प्रकरणाबाबत संघटनेने लेखी निवेदन द्यावीत. आपण सदर प्रकरणांमध्ये विशेष लक्ष घालु असे सांगितले. तसेच माध्यमिक विभागाची अनुकंपा भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी असे संघटनेने लेखी म्हणणे दिले असता. अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल त्यात कोणतीही अडचण नाही असे ही त्यांनी सांगितले . इतर विविध प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली . तसेच कास्ट्राईब संघटनेच्या वतीने आलेला कोणत्याही प्रश्न प्रशासनाचे वतीने मी सोडवण्याचे प्रयत्न करेन आणि कोणत्याही मागासवर्गीय शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना महेश चोथे यांनी दिले आहे.
सदर बैठकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम, सचिव किशोर कदम , सिधुदुर्ग कास्ट्राईब प्राथमिक संघटना जिल्हाध्यक्ष विकास वाडीकर, कोल्हापूर शिक्षक संघटनेचे सरचिटणीस संजय कुडूकर, रत्नागिरी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे,जिल्हा सचिव संतोष मोहिते, माध्यमिक विभाग अध्यक्ष शिरीषकुमार रत्नागिरी माध्यमिक संघटना जिल्हाध्यक्ष भालशंकर, संचालक प्रकाश पांढरे इत्यादी उपस्थित होते.





