कणकवली : विश्वकर्मा मित्र मंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय बेलगाडा शर्यत स्पर्धा रविवार १२ फेब्रुवारी दुपारी १:०० वाजल्यापासून कणकवली येथील निम्मेवाडी येथे श्री देव स्वयंभू मंदिरानजिक पार पडणार आहेत. काही नियम व अटी शर्तीसह बेलगाडा स्पर्धाना परवानगी मिळाल्यानंतर कणकवली येथे प्रथमच ही भव्य दिवस स्पर्धा पार पडणार आहे.
या सर्धेतील विजेत्या बैलगाड्याला रुपये १५,००० व आकर्षक चषक तर उपविजेत्या बैलगाड्याला रुपये १०,००० व आकर्षक चषक तर तृतीय क्रमांक विजेत्या बैलगाड्याला रूपये ५००० हजार व आकर्षक चषक दिला जाणार आहे. या बैलगाड्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच अन्य जिल्ह्यातील बैलगाडा सहभागी होणार आहेत स्पर्धेचे अधिक माहितीसाठी नितीन पांचाळ ( ९०९६०१२५१४), महेश मेस्त्री, ( ७४९९३३७४१४), अक्षय मेस्त्री, प्रतीक मेस्त्री यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विश्वकर्मा मित्र मंडळ कणकवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.





