ठाकरे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची २८ रोजी कणकवलीत बैठक जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची महत्वाची बैठक कणकवली मुडेडोंगरी वाळकेश्वर हॉल येथे गुरुवार २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील विधानसभा प्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाप्रमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, शिवसेना तालुकाप्रमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, युवासेना तालुकाप्रमुख, महिला तालूकाप्रमुख, शिवसेना शहरप्रमुख, महिला शहरप्रमुख, युवासेना शहरप्रमुख, शिवसेना उपतालुकाप्रमुख, शिवसेना विभागप्रमुख व उपविभागप्रमुख, अल्पसंख्याक सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, ग्राहक संरक्षण सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख मागास सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, जिल्हा चिटणीस, अनुसूचित जाती सेल जिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख, जिल्हा सरचिटणीस, युवासेना व महिला उपजिल्हाप्रमुख, महिला व युवासेना शहरप्रमुख, महिला व युवासेना उपतालुकाप्रमुख, महिला व युवासेना विभागप्रमुख, निमंत्रित सदस्य यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.