आज मळेवाड येथे श्री देव कुलदेवतेचा वार्षिक जत्रोत्सव
सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी मळेवाड देऊळवाडी येथील श्री कुलदेवता मंदिरात वार्षिक जत्रोत्सव संपन्न होणार आहे सकाळी पूजाच्या नवस फेडणे, ओट्या भरणे असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भक्तांनी श्री देवी कुलदेवतेच्या दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे रात्री नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग संपन्न होणार आहे याचाही रसिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.