Home देवगड विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज ;  देवगड तालुक्यातील एकूण १३६ मतदान केंद्रावर...

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज ;  देवगड तालुक्यातील एकूण १३६ मतदान केंद्रावर मतदान होणार

12

 

देवगड : प्रतिनिधी

 

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज ;  देवगड तालुक्यातील एकूण १३६ मतदान केंद्रावर मतदान होणार

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज झाली असून देवगड तालुक्यातील एकूण १३६ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.एकूण ९०,७९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

 

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे.निवडणुक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.देवगड तालुक्यात एकूण १३६ मतदानकेंद्रावर मतदानप्रक्रिया पार पडणार असून यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर  एकूण सात कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.तालुक्यात एकूण २१ झोनल ऑफिसर नियुक्त करण्यात आले असून मतदान प्रक्रियेसाठी देवगड आगारातून १४ एसटी बसेस मतदानयंत्रणा घेवून रवाना झाल्या आहेत.यामुळे देवगड आगारातील पणजी, बेळगाव तसेच काही इतर फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

 

देवगड तालुक्यात एकूण ९०,७९१ मतदार असून ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत.प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या आहेत.घरोघरी प्रचार व जाहीर प्रचारसभा, रॅली आदींनी गेले काही दिवस निवडणुक वातावरण तापले होते.भाजपाचे नितेश राणे व शिवसेनेचे संदेश पारकर यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.