रोजगार आणि आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक रिंगणात ,नवाज खानींना मतदारांचा मिळतोय चांगला प्रतिसाद
कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत.त्यामुळे निवडणुकीची लढाई नक्कीच जिंकणार आहे.कणकवली मतदारसंघात विकासाची गंगा आणायची आहे.रोजगार आणि आरोग्याचे प्रश्न सोडवायचे आहेत.त्यामुळे येथील जनतेने ठामपणे माझ्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज हुसेन खानी यांनी महळूंगे आवळ्याचा काटा येथे उपस्थित ग्रामस्थांना केले
यावेळी प्रचारार्थ देवगड तालुक्यातील महळूंगे आवळ्याचा काटा येथे धनगर वस्तीला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि समस्या जाणून घेतल्या आणि या भागातील विकास कामे आणि समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असुन मला मतदान करून भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन हि त्यांनी केले.
यावेळी उपस्थित महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा,युवकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे नवाज खानी म्हणाले.
यावेळी शशिकांत इंगळे अनिल चव्हाण नागेश बोडेकर राजू इंगळे सुनील ननवरे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.