आचरा काही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी जळीत दुकानाची पहाणी करत निलेश राणे यांनी दिला गवळी कुटूंबाला धीर By maharashtra maza team - November 12, 2024 75 WhatsAppFacebookTelegramTwitter आचरा(अर्जुन बापर्डेकर) काही काळजी करू नका मी तुमच्या पाठीशी जळीत दुकानाची पहाणी करत निलेश राणे यांनी दिला गवळी कुटूंबाला धीर मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून गवळी कुटूंबाला धीर दिला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, राजन गांवकर, निलीमा सावंत, संतोष गांवकर, दिपक सुर्वे, आचरा उपसरपंच संतोष मिराशी,जयप्रकाश परुळेकर, प्रकाश मेस्त्री,राजन पांगे,मनोज हडकर, मुजफ्फर मुजावर,बाबू कदम, देवेंद्र हडकर, पळसंब सरपंच महेश वरक,महेंद्र घाडी,उदय घाडी,पंकज आचरेकर,रुपेश हडकर, किशोर आचरेकर यांसह अन्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी भक्ती हार्डवेअर चे मालक विनोद गवळी आणि कुटूंबाला धीर दिला.