निकालाच्या दिवशी विजयी षटकार मीच मारणार आहे – बंदेनवाज खाणी

72

 

कणकवली (प्रतिनिधी)

निकालाच्या दिवशी विजयी षटकार मीच मारणार आहे – बंदेनवाज खाणी

निवडणुकीत उभे राहणे तेवढे सोपे नव्हते. समोरची बलाढ्य ताकद आहे. पैसे, गुंडागर्दीच्या जोरावर मला धमकावण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा पोलिसांनी मला बंदोबस्त दिला आहे. अशा बलाढ्य ताकदीच्या समोर मी सर्वसामान्य – युवा समोर येऊन उभे राहणे सोपे नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये न माझ्यापाठी अदृश्य हात आहे. त्या अदृश्य हाताचा पराक्रम आपल्याला दिसेल. मी कोणालाही घाबरून मैदान सोडणार नाही. माझा मुस्लीम समाज माझ्या पाठीशी आहे. निकाला दिवशी विजयी षटकार मीच मारणार आहे, असा विश्वास कणकवलीचे अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केला आहे.

 

कणकवली विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत फयाज खान, आरीफ काझी, जहीद धोपावकर, विनायक पाठाडी, रोहित पावसकर, आक्रम शेख यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

मी एकेकाळी निलेश राणे यांचा कार्यकर्ता होतो. नितेश राणे आणि माझा काहीही संबंध नाही. समस्या कधीही संपत नाही. ग्रामीण भागात विकास करत असताना एकता राहणे गरजेचे आहे. प्रयत्न करून समस्या सोडवण्याची गरज आहे.

या भागात महत्त्वाची समस्या म्हणजे बेरोजगारीची समस्या सोडवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आरोग्य, कॅन्सर असे आजार होत असताना त्यात आमचा प्लॅन तयार आहे.कोणाला तरी कोणी उभे केले.आणि कोण कोणाचा खरा माणूस आहे, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मी प्रचाराच्या निमित्ताने गावागावामध्ये, वाडीवाडीमध्ये, बौद्धविहारामध्ये, मस्जिदीमध्ये जात आहे. तेथील युवावर्ग, वृद्ध वर्ग तसेच सर्व मला साथ देत आहेत.

आम्हाला सेटलमेंट आमदार नकोय. मी यापूर्वी काम केले आहे. येथील जनता ७०-८० टक्के मला ओळखते. आशेचे किरण फार मोठा आहे. माझी भूमिका सुनामीसारखी आहे.माझा विजय १०० टक्के पक्का आहे, असा विश्वास अपक्ष उमेदवार बंदेनवाज खानी यांनी व्यक्त केला.