ज्येष्ठ नेते आमचे सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय शरद पवार साहेबांविषयी सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या थराला जाऊन घृणास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी असून, अतिशय संतापजनक वक्तव्य आहे.
या संपूर्ण प्रकारचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करते आणि अशा प्रकारची वक्तव्ये आम्ही कदापीही खपवून घेणार नाही. तसेच या प्रकारची वक्तव्ये सर्वांनी टाळावीत व एक तारतम्य आणि भान बाळगून प्रचार करावा.