संदेश पारकर यांनी खांबाळे येथील आदिष्टीदेवी मंदिरात घेतले दर्शन !
संदेश पारकर यांचा 100% विजय पक्का खांबाळे ग्रामस्थांचा निर्धार
तालुक्यातील खांबाळे येथील आदिष्टी देवी मंदिरात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी खांबाळे येथील आदिष्टी देवी मंदिरात दर्शन घेतले. संदेश पारकर यांचे खांबाळे गावात जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी ग्रामस्थांनी येथील दहशतवाद मोडून काढण्यासाठी संदेश पारकर यांच्या पाठीशी ठामपणे राहणार व संदेश पारकर यांना या प्रभागातून शंभर टक्के मतदान करणार असा निर्धार केला.
तसेच आमच्या भागाचा विकास संदेश भाई पारकर हेच करू शकतात. असे उद्गार येथील ग्रामस्थांनी जनतेला संबोधित करताना केले. त्यामुळे संदेश पारकर यांचा 100% विजय पक्का आहे. असा निर्धार खांबाळे गावातून करण्यात आला.