दोडामार्ग : प्राचीन काळापासून चालत आलेल्या संगीताच्या परंपरेला आता मोठे वैभव प्राप्त झाले असुन संगीत प्रांतात नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. प्रा. मोहनराव देसाई यांनी कळणे सारख्या ग्रामीण भागात ‘आडियल स्कूल ऑफ म्युझिक’ सुरु करुन एक आदर्श निर्माण केला आहे. असे गौरोदगार प्रख्यात गायक स्वप्निल बांदोडकर यांनी सावंतवाडीत काढले.
कळणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कळणे संचलित नुतन विद्यालय कळणे व प्रा. एम.डी. देसाई कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय कळणे तसेच सुप्रसिध्द गायक स्वप्निल बांदोडकर यांच्या ‘संक्रम’ म्युझिक अकादमी यांच्या सयुक्त विद्यमाने आडियल स्कूल ऑफ म्युझिक या वर्गाची सुरूवात संस्थाध्यक्ष प्रा. मोहनराव देसाई यांच्या संकल्पनेतून दोडामार्ग तालुक्यातील कळणे विद्यालयात करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगीत कलेची आवड निर्माण होवुन त्यात आजच्या पिढीने करिअर करावे हा त्यामागचा उद्देश आहे. गायक स्वप्निल बांदोडकर यानी मुलांशी संवाद साधत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध राहीन, नुतन विद्यालय कळणे मधील संगीत विद्यालयावर आपले विशेष प्रेम असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी आर्या सावंत, मूक्ता देसाई, दीपा सुतार, कल्पिता देसाई, उर्वी देसाई, अन्वी धुपकेर, तेजल देसाई, शलका पवार, वेदान्त कळणेकर, सोहम सावंत, यशवंत भुजबळ, हर्ष नार्वेकर, लश्मीण धरी, तनिष्का दळवी आदी मुलानी संगितविषयी बातचीत केली. यावेळी संस्थेचे संचालक नीरज देसाई, गणेशप्रसाद पोकळे, प्रसाद साटेलकर, प्रसाद गोसावी, प्रशांत राऊळ, सतीश धर्णे, अच्युत गावडे, कृष्णा देसाई, मधुकर गावकर उपस्थित होते.





