सिंधुदुर्गनगरी : ओरोस खालची परबवाडी येथील श्री. देव महापुरुष ब्राम्हण मंदिराचा वार्षिक उत्सव व तृतीय वर्धापन दिन सोहळा श्री देव महापुरुष कला व क्रीडा मंडळाच्या वतीने १३ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
वार्षिक उत्सवानिमित्त सोमवारी सकाळी ७ वाजता गणेश पूजन व अभिषेक, ८ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, ४ वाजता हळदीकुंकू, सायंकाळी ६ ते ८ वाजता बोर्डवे येथील पंचरत्न प्रासादिक भजन मंडळ मंगेश बागवे बुवा याचे दिंडी भजन, रात्री ९ वाजता सिंधुदुर्ग दत्तमाऊली पारंपरिक दशावतार नाट्यमंडळाचा संयुक्त दशावतार प्रणाली युक्त शेषात्मज गणेश धमाल विनोदी नाटक आयोजित करण्यात आले आहे.
सर्व भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महापुरुष कला व क्रीडा मंडळाने केले आहे.




