सावंतवाडी (हेमंत मराठे)
विशाल परब यांनी अर्ज मागे घेतला नाही तर पक्षातून हकालपट्टी होणार – जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या उमेदवारीशी भाजपचा कोणताही संबंध नाही. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी होईल, पक्षविरोधी भुमिकेमुळे कारवाई होईल अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते.





