कणकवली (प्रतिनिधी)
कमिशनर जगणारा आमदार अशी नितेश राणेंची ओळख – सतीश सावंत
कणकवली मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक कामात राणेंकडून कमिशन घेतले जाते. त्यामुळे कमिशनवर जगणारा आमदार अशी नितेश राणेंची ओळख निर्माण झाली आहे अशी टीका शिवसेना ठाकरे पक्ष कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केले.
कणकवलीतील सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, माजी खासदार हुसेन दलवाई, भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार परशूराम उपरकर, उपनेते गौरीशंकर खोत, शिवसेना नेते सतीश सावंत, महिला जिल्हा अध्यक्षा नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, अनंत पिळणकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आदी उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, सिंधुदुर्गात
सिंचनाचे सर्व प्रकल्प मी आणले अशा वल्गना खासदार नारायण राणे यांनी केल्या. पण ज्या राणेंनी नरडवे धरणाचे भूमिपूजन केले,
त्याच राणेंना गेल्या वीस वर्षात हा प्रकल्प पूर्ण करता आलेला नाही.
वैभववाडी घाटमार्ग वर्ष झाले तरी सुरू होऊ शकलेला नाही.वैभववाडी उंबर्डे आणि इतर प्रमुख रस्ते खड्डेमय झाले आहेत.रस्त्यांची दूरवस्था, ठप्प झालेले सिंचन प्रकल्प हाच कणकवली मतदारसंघाचा विकास आहे का? याबाबत नारायण राणे यांनी आधीआपल्या मुलाकडून माहिती घ्यायला हवी.असे सावंत म्हणाले.





