श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे वाचन प्रेरणा दिन
सावंतवाडी (मंगल कामत)
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला. यावेळी नवीन खरेदी केलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन मांडण्यात आले. संस्थेचे उपकार्याध्यक्ष डॉ. बुवा यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र आणि वाचनाचे महत्व या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी त्यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून १५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह श्री. रमेश बोंद्रे, सहकार्यावाह श्री. गणेश बोर्डेकर, ग्रंथालय कर्मचारी सौ. रंजना कानसे श्री. महेंद्र सावंत, श्री. गुरुप्रसाद वाडकर, तसेच बहुसंख्येने सभासद, वाचक, पुस्तकप्रेमी उपस्थित होते. आभार ग्रंथपाल श्री. महेंद्र पटेल यांनी व्यक्त केले.